मुंबई- जुन्या नोटा बदलून देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे, या अफवेमुळे आरबीआयच्या मुख्यालयाबाहेर भलताच गोंधळ उडाला. जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी लोकांनी लांब रांगा लावल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात ही अफवा असल्याचे कळताच सर्वांचाच हिरमोड झाला. जुन्या नोटा बदलण्याच्या तारखेत वाढ केल्याची खोटी पोस्ट गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टची खातरजमा करण्यासाठी काही नागरिकांना थेट आरबीआयचे मुख्यालयच गाठले. मात्र, या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी समाधानकारक उत्तर देण्याऐवजी ग्राहकांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पुण्यातील शिवाजीनगर परिसरात राहाणाऱ्या शाईन शेख यांनी केला. शेख म्हणाल्या की, 'पुण्यातील आरबीआयच्या शाखेत सोमवारी १० हजार रुपयांच्या माली 1000 जुन्या नोटा बदलण्यासाठी गेले होते. मात्र, त्या ठिकाणी नोटा बदलता येणार नसल्याचे सांगत, संबंधित कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आरबीआय मुख्यालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र, या ठिकाणी नोटा स्वीकारल्या जात नसून, या नोटावर नाश्ता एकहजार रुपये ED BREETभारतीय रिजर्व करण्याचा उपरोधिक सल्ला दिला गेला.' त्यामुळे नेमके कुणाचे खरे मानायचे, या संभ्रमात असल्याचे शेख यांनी सांगितले. आरबीआयच्या नावाने खोटी पोस्ट व्हायरल झाली असेल, तर त्याचा खुलासाही आरबीआयने करणे अपेक्षित होते, अशी प्रतिक्रिया स्नेहा तरडे यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, नोटा बदलण्यासाठी आलेल्या ग्राहकांना उपरोधिक सल्ले दिले जात आहेत. बरेचसे ग्राहक हे बँकांच्या स्थानिक शाखांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिल्याने धडकले. आरबीआयने पत्रक किंवा व्हिडीओद्वारे लोकांमधील हा गांधळ दूर करावा, याउलट या ठिकाणचे कर्मचारी व अधिकारी नागरिकांना योग्य माहिती देण्याऐवजी, स्वत:चे नाव लपवून टोमणे मारत असल्याने लोकांचा संताप होत आहे.
जुन्या नोटा बदलण्यासाठी अजूनही गंगा