दगडफेक करण्यासाठी मिळतात दिवसाला 5 हजार रुपये, स्टिंग ऑपरेशनद्वारे खुलासा

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कर आणि पोलिसांवर जी दगडफेक होते त्यासाठी आंदोलकांना पैसे दिले जातात असा खुलासा एका स्टिंग ऑपरेशनद्वारे केला गेला आहे. दगडफेक करणाऱ्या आंदोलकांनी ही बाब कॅमेऱ्यासमोर सांगितली आहे. एका आंदोलकाने सांगितले की तो २००८ पासून दगडफेक करण्याचे काम करत आहे. त्याला एका दिवसाला ५०० रुपये ते ५,००० रुपये मिळतात असे देखील त्याने सांगितले. बुरहान वानीच्या मृत्यूनंतरही आपण दगडफेक केल्याचे त्याने सांगितले आहे. _ स्टिंग ऑपरेशनमध्ये त्यांनी ही बाब सांगितली आहे. जाकिर हमद भट या दगडफेक करणाऱ्या आंदोलकाने सांगितले की आम्हाला या कामासाठी पैसे, कपडे आणि बूटही दिले जातात. हे पैसे कुणाकडून येतात या बाबत आम्हाला फारशी माहिती नाही असे त्याने म्हटले. मला असिफ नावाचा एक मित्र पैसे आणून देत असे. मी फकलेल्या दगडामुळे अनेक पोलीस अधिकारी आणि जवान जखमी झाल्याचे फारुक या आंदोलकाने सांगितले. जर पोलिसांनी आम्हाला पकडले तर आम्ही पैशाबाबत कधीही सांगत नाहीत असे फारुकने म्हटले. या दगडफेक करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर असते. त्यामुळे दगडफेक झाल्यानंतर आम्ही घरी काही दिवसांसाठी जात नाहीत असे त्यांनी सांगितले. दगडफेकीबाबतच्या सूचना एका व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे दिल्या जातात अशी माहिती पोलिसांनी दिली. हा व्हॉट्सअॅप ग्रुप पाकिस्तानमधून चालवला जातो असे त्यांनी म्हटले. व्हॉट्सअॅप द्वारे पोलीस आणि लष्कर कुठे आहे याबाबत सांगितले जाते. त्यांची स्थिती काय आहे याबाबतची माहिती दगडफेक करणाऱ्या आंदोलकांना आधीच मिळते असे ते म्हणाले. ज्यावेळी संघर्षाला सुरुवात होते. त्यावेळी कोणत्या ठिकाणी जाऊन दगडफेक करायची किती वेळ करायची याचा सूचना व्हॉट्सअॅपवर दिल्या जातात असे पोलिसांनी सांगितले. लष्कर आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षात अनेक जण जखमी झाले. आंदोलकांना पसरवण्यासाठी लष्कराने पेलेट गन्स वापरल्या. त्यामध्ये कित्येक तरुणांना आपले डोळे गमवावे लागले आहेत.


Popular posts
मीरा-भाईदरमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी
ब्रिटिशकालीन १९० वर्षे जुना । अमृतांजन पूल जमिनदोस्त __पुणे - कोरोना
जुन्या नोटा बदलण्यासाठी अजूनही गंगा
पंतप्रधानांनी लॉकडाउन न वाढवण्याचे दिले संकेत
शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेजारील कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि आंध्र प्रदेशकडून सातत्याने कृष्णा खोऱ्यातील प्रकल्पांना निधी आणण्याचे या तिन्ही राज्यांचे प्रयत्न सिंचन खर्चात महाराष्ट्रापेक्षा आंध्र, तेलंगण, कर्नाटक आघाडीवर!