ब्रिटिशकालीन १९० वर्षे जुना । अमृतांजन पूल जमिनदोस्त __पुणे - कोरोना

पुणे - कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनचा फायदा घेत पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील ऐतिहासिक अमृतांजन पूल ब्लास्टनं उडवण्यात आला आहेमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील हा ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल होता. ब्लास्टनंतर काही क्षणातच हा पूल उद्धवस्त झाला. त्यामुळे हा ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल अखेर इतिहासजमा झाला आहेसुरुवातीला या पूलच्या कमानी पाडल्या गेल्यात्यानंतर हा पूल संपूर्ण जमीनदोस्त केला गेला.. ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल हटवण्यासाठी जून २०१७ मध्ये हालचाली सुरू झाल्या होत्यामात्र, कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ४ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान पूल जमीनदोस्त करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार ५ एप्रिल रोजीच ब्रिटिशकालीन पूल ब्लास्टने जमीनदोस्त करण्यात आला. जुन्या पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर खंडाळाबोरघाटातील मार्ग सुकर करण्यासाठी ऐतिहासिक अमृतांजन पूल १८३० मध्ये उभारण्यात आला होता. ब्रिटिश अधिकारी सर कॅप्टन ह्यूजेस यांनी जनरल जॉन मालकोल्म जी.सी.ई. अँनो डोमिनी यांच्या मार्गदर्शनाखाली हा पूल उभारण्यात आला होता. मात्र, या मार्गावर ताण वाढू लागला म्हणून २००० साली पुणे-मुंबई एक्सप्रेस वे उभारण्यात आला. अमृतांजन पूल खालून एक्सप्रेस वेची चार पदरे जात होती आणि हीच बाब वाहतूक कोंडी आणि अपघातास कारणीभूत ठरत होती.


Popular posts
मीरा-भाईदरमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी
जुन्या नोटा बदलण्यासाठी अजूनही गंगा
पंतप्रधानांनी लॉकडाउन न वाढवण्याचे दिले संकेत
शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेजारील कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि आंध्र प्रदेशकडून सातत्याने कृष्णा खोऱ्यातील प्रकल्पांना निधी आणण्याचे या तिन्ही राज्यांचे प्रयत्न सिंचन खर्चात महाराष्ट्रापेक्षा आंध्र, तेलंगण, कर्नाटक आघाडीवर!