खासदारांच्या वेतनात ३०% कपात

नवी दिल्लीः केंद्रीय मंत्रिमंडळाने महत्त्वाचे पाऊल उचलत खासदार निधीअंतर्गत मिळणारा फंड पुढील दोन वर्षासाठीरद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या बरोबरच मंत्रिमंडळाने वर्षभरासाठी खासदारांच्या पगारातून ३० टक्क्यांची कपात करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या बाबतच्या अध्यादेशाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. खासदार निधी आणि खासदारांच्या पगारात ३० टक्के कपात करून जमा होणार निधी करोनाविरुद्धच्या लढाईसाठी वापरण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळाच्या या निर्णयाबाबत माहिती दिली. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्व राज्यपाल आणि खासदार आपल्या वेतनातील ३० हिस्सा करोना विषाणशी लढा देण्याच्या कामासाठी देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा वेतन कपातीचा आणि दोन वर्षासाठी खासदार निधी स्थिगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय अंमलात आणण्यासाठी त्याबाबतचा एक अध्यादेश काढण्यात येईल. त्यानंतर संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर त्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्यात येईल. खासदारांना दरवर्षी खासदार निधी देण्यात येतो. सर्व खासदार आपापल्या मतदारसंघांमध्ये या खासदारनिधीचा विकासकामांसाठी वापर करत असतात. आजच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयानसार खासदारांना हा निधी दोन वर्षे वापरता येणार नाही. याचे कारण म्हणजे खासदारांचा खासदार निधीही दोन वर्षासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


Popular posts
मीरा-भाईदरमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी
ब्रिटिशकालीन १९० वर्षे जुना । अमृतांजन पूल जमिनदोस्त __पुणे - कोरोना
जुन्या नोटा बदलण्यासाठी अजूनही गंगा
पंतप्रधानांनी लॉकडाउन न वाढवण्याचे दिले संकेत
शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेजारील कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि आंध्र प्रदेशकडून सातत्याने कृष्णा खोऱ्यातील प्रकल्पांना निधी आणण्याचे या तिन्ही राज्यांचे प्रयत्न सिंचन खर्चात महाराष्ट्रापेक्षा आंध्र, तेलंगण, कर्नाटक आघाडीवर!