पंतप्रधानांनी लॉकडाउन न वाढवण्याचे दिले संकेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत पुकारण्यात आलेला लॉ कडाउन न वाढवण्याचे संकेत दिले आहेत. लॉकडाउनच्या काळातले निर्बध सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच लॉकडाउन संपल्यानंतर आवश्यक धोरणं आखणं गरजेचं आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. लॉकडाउन संपल्यानंतर दहा मुख्य निर्णयांसह तयार रहा असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्र्यांना म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यानंतर त्यांनी हे संकेत दिले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला. हा लॉडाउन १४ एप्रिलपर्यंत आहे. त्यामुळे त्यापुढे काय? कडाउन आणखी वाढणार की संपणार प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. कारण लॉकडाउनमुळे अवघा देश ठप्प झाला आहे. हातावरचं पोट असलेले हजारो कामगार रस्त्यावर आले आहेत. त्यांच्यासाठी सरकार उपाय योजना करतं आहे. मात्र तरीही कडाउन संपणार की नाही हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. तूर्तास तरी मोदींनी लॉकडाउन संपेल असे संकेत दिले आहेत.


Popular posts
मीरा-भाईदरमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी
ब्रिटिशकालीन १९० वर्षे जुना । अमृतांजन पूल जमिनदोस्त __पुणे - कोरोना
जुन्या नोटा बदलण्यासाठी अजूनही गंगा
शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेजारील कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि आंध्र प्रदेशकडून सातत्याने कृष्णा खोऱ्यातील प्रकल्पांना निधी आणण्याचे या तिन्ही राज्यांचे प्रयत्न सिंचन खर्चात महाराष्ट्रापेक्षा आंध्र, तेलंगण, कर्नाटक आघाडीवर!