ठाकरेंचा नवा बंगला, 'मातोश्री-२' च्या बांधकामाला सुरूवात

च्या बांधकामाला मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवा बंगला बांधत आहेत. 'मातोश्री' बंगल्याजवळ कलानगरमध्येच ही आलिशान सहा मजली इमारत उभी राहत आहे. उद्धव ठाकरे यांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये कलानगरमधील एक प्लॉट ११.६० कोटी रुपयांना खरेदी केला होता. | त्यातील १० हजार चौरस फुटांपेक्षा जास्त जागेवर ते आपलं नवं घर | बांधत आहेत. 'तलाटी अँड पथकी' | ही प्रसिद्ध आर्किटेक्चर कंपनी ही इमारत बांधत आहे. या इमारतीत बेसमेंट, स्टिल्ट आणि सहा मजले आहेत. त्यातील प्रत्येक फ्लॅटमध्ये पाच बेडरुम, एक स्टडी रुम, असणार आहे. या जागेवर कलाकार के. के. हेब्बर राहत होते. १९९६मध्ये त्यांचं निधन झाल्यानंतर ही जागा त्यांची | पत्नी सुशीलाच्या नावावर झाली होती. २००७ साली सुशीला यांच्या मुलांनी | ही जागा प्लॅटिनम इंफ्रास्ट्रक्चरला | ३.५ कोटी रुपयांमध्ये विकली. प्लॅनेटियमचे मालक राजभूषण आणि जगभूषण दीक्षित यांनी या जागेवर आठ मजली इमारत बनवण्याची परवानगी घेतली होती. प्लॅटिनमने त्यांच्या प्रोजेक्टसाठी हेब्बार कुटुंबाचा दोन मजली बंगला पाडला. २०१६ मध्ये जागा विकण्याची परवानगी प्लॅटिनमला मिळाली. या मोबदल्यात । मिळणारी ५० टक्के रक्कम राज्य सरकारला दिली जावी, या अटीवर प्लॅटिनमला एप्रिल २०१६ मध्ये हस्तांतरणाची परवानगी देण्यात आली. त्यानंतर, या जमिनीच्या अधिग्रहण आणि पुनर्विकासासाठी ठाकरे कुटुंबाने कलानगर सहकारी सोसायटीकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेतलं आणि ऑक्टोबर २०१६ मध्ये ठाकरे कुटुंबियांनी ही जागा ११.६० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली.