बाबरी मशीद - राम जन्मभूमी वाद पन्हा एकदा चर्चेत आहे. 'मंदिर वही बनायेंगे' चा वारंवार नारा लावणारे योगी आदित्यनाथ हे आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तारूढ झाल्यावर राममंदिर निर्मितीतील सर्व अडचणी दूर केल्या जातील, अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी जवळपास दोन वर्षापूर्वी संसदेत केले होते. आणि आता या राज्यात संपूर्ण बहुमतासह भाजपाचे सरकार स्थापन झाले असून, स्वतः योगीच मुख्यमंत्री झाले आहेत. अशात राममंदिर निर्मितीची आस धरून बसलेल्यांची अपेक्षा उंचावणे स्वाभाविक आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा पुन्हा एकदा परस्पर सामंजस्यातून या वादावर तोडगा काढण्याचा सल्ला दिला आहे. या विषयावर मागणी झाल्यास मध्यस्थी करण्यासही न्यायालय राजी आहे. अर्थात सत्ताधारी भाजपाने अयोध्येत राममंदिर निर्मितीचा मुद्दा नेहमीच उचलून धरला असला तरी पक्षाने हे प्रकरण अनेक वर्ष थंडबस्त्यात ठेवले हेसुद्धा एक सत्य आहे. आता जेव्हा की उत्तर प्रदेशात भाजपाचे सरकार आले आहे आणि त्याचे नेतृत्व योगीकडे आहे; एकतर न्यायालयाने मंदिराच्या बाजूने निर्णय द्यावा अथवा केंद्रातील स्पष्ट बहुमतातील भाजपा सरकारने घटना दुरुस्तीचा मार्ग अवलंबून मंदिर निर्मिती करावी ही मागणी जोर धरू लागली आहे. परंतु अजूनही रामभक्तांना वाटते तेवढी राममंदिराची निर्मिती सोपी नाही, हे लक्षात घ्यावे लागेल. बाबरी मशीद - राम जन्मभूमी वाद पन्हा एकदा चर्चेत आहे. 'मंदिर वही बनायेंगे' चा वारंवार नारा लावणारे योगी आदित्यनाथ हे आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तारूढ झाल्यावर राममंदिर निर्मितीतील सर्व अडचणी दूर केल्या जातील, अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी जवळपास दोन वर्षापूर्वी संसदेत केले होते. आणि आता या राज्यात संपूर्ण बहुमतासह भाजपाचे सरकार स्थापन झाले असून, स्वतः योगीच मुख्यमंत्री झाले आहेत. अशात राममंदिर निर्मितीची आस धरून बसलेल्यांची अपेक्षा उंचावणे स्वाभाविक आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा पुन्हा एकदा परस्पर सामंजस्यातून या वादावर तोडगा काढण्याचा सल्ला दिला आहे. या विषयावर मागणी झाल्यास मध्यस्थी करण्यासही न्यायालय राजी आहे. अर्थात सत्ताधारी भाजपाने अयोध्येत राममंदिर निर्मितीचा मुद्दा नेहमीच उचलून धरला असला तरी पक्षाने हे प्रकरण अनेक वर्ष थंडबस्त्यात ठेवले हेसुद्धा एक सत्य आहे. आता जेव्हा की उत्तर प्रदेशात भाजपाचे सरकार आले आहे आणि त्याचे नेतृत्व योगीकडे आहे; एकतर न्यायालयाने मंदिराच्या बाजूने निर्णय द्यावा अथवा केंद्रातील स्पष्ट बहुमतातील भाजपा सरकारने घटना दुरुस्तीचा मार्ग अवलंबून मंदिर निर्मिती करावी ही मागणी जोर धरू लागली आहे. परंतु अजूनही रामभक्तांना वाटते तेवढी राममंदिराची निर्मिती सोपी नाही, हे लक्षात घ्यावे लागेल.
बाबरी मशीद विध्वंसापूर्वी आणि नंतरही परस्पर समझोत्याचे प्रयत्न झाले आहेत आणि बहुदा या वादावर तोडग्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे. परंतु आजवर हे सर्व प्रयत्न यशस्वी न होण्यातही खूप काही दडून आहे. अशा काही गाठी आहेत ज्या अद्याप उकल शकलेल्या नाहीत. आता न्यायालयाने समझोत्याचा सल्ला दिला आहे. तडजोडीचा अर्थच काही पदरात पडणे तर काही गमावणे असा होतो. कधीकधी अशीही परिस्थिती निर्माण होते जेव्हा काही गमावन काही मिळविता येते. या प्रकरणात सुद्धा तशी तयारी ठेवली पाहिजे असे मला वाटते. आपण काही गमावतो आहे असे न समजता प्रयत्न केले तर मार्ग अधिक सुकर होऊ शकतो. जेथवर प्रभु श्रीरामाच्या जन्मस्थळाचा प्रश्न आहे तर ही एक आस्था आहे. ऐतिहासिक आणि पुरातात्त्विक पुरावे नसले तरी या आस्थेचा आदर केला पाहिजे. परंतु एकाची आस्था जपण्याकरिता दुसऱ्याच्या भावना पूर्णपणे चिरडून टाकणेही योग्य नाही. आस्था आणि भावना दोहोंचे रक्षण कसे करायचे हा प्रश्न आहे. बाबरी मशीद विध्वंसापूर्वी आणि नंतरही परस्पर समझोत्याचे प्रयत्न झाले आहेत आणि बहुदा या वादावर तोडग्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे. परंतु आजवर हे सर्व प्रयत्न यशस्वी न होण्यातही खूप काही दडून आहे. अशा काही गाठी आहेत ज्या अद्याप उकल शकलेल्या नाहीत. आता न्यायालयाने समझोत्याचा सल्ला दिला आहे. तडजोडीचा अर्थच काही पदरात पडणे तर काही गमावणे असा होतो. कधीकधी अशीही परिस्थिती निर्माण होते जेव्हा काही गमावन काही मिळविता येते. या प्रकरणात सुद्धा तशी तयारी ठेवली पाहिजे असे मला वाटते. आपण काही गमावतो आहे असे न समजता प्रयत्न केले तर मार्ग अधिक सुकर होऊ शकतो. जेथवर प्रभु श्रीरामाच्या जन्मस्थळाचा प्रश्न आहे तर ही एक आस्था आहे. ऐतिहासिक आणि पुरातात्त्विक पुरावे नसले तरी या आस्थेचा आदर केला पाहिजे. परंतु एकाची आस्था जपण्याकरिता दुसऱ्याच्या भावना पूर्णपणे चिरडून टाकणेही योग्य नाही. आस्था आणि भावना दोहोंचे रक्षण कसे करायचे हा प्रश्न आहे.
काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रांत एक बातमी प्रकाशित झाली होती. अयोध्येत हुनमानगढी मंदिराच्या मालकीच्या जमिनीवर एक मशीद उभारण्यासंदर्भातील ते वृत्त होते. ते मशिदीला विरोध करणारे खचितच नव्हते. हनुमानगढी मंदिराचे महंत ज्ञानदासजी यांनी केवळ या मशिदीच्या पुननिर्मितीची परवानगीच दिली नाहीतर जोवर ही मशीद तयार होत नाही तोवर या भूमीवर नमाज पठनाचाही सल्ला दिला होता. शेवटी हेसुद्धा स्वतःचेच घर आहे, असे त्यांचे म्हणणे होते. या आलमगिरी मशिदीची निर्मिती सतराव्या शतकात औरंगजेबाच्या एका शिलेदाराने केली होती. इ.स. १७६५च्या जवळपास नवाज शुजाउदुल्ला यांनी मशिदीची ही संपूर्ण जमीन हनुमानगढी मंदिराला या अटीसह दानात दिली की मशिदीत नमाज पठन सुरूच राहील. वृत्तपत्रात प्रसिद्ध बातमीनुसार कालांतराने तेथील नमाज पठन बंद झाले. मशिदीची इमारत मात्र कायम राहिली. परंतु देखभालीअभावी मशिदीची ही इमारत पडीक झाली आणि अयोध्या नगरपालिकेने येथील प्रवेशावर निर्बध घातले. काही दिवसांपूर्वी स्थानिक मुस.ीम बांधवांनी हनुमानगढीचे मुख्य महंत ज्ञानदासजी यांच्याकडे मशिदीच्या पुनर्बाधणीची परवानगी मागितली. महंतजींनी केवळ परवानगीच दिली नाहीतर यासाठी लागणारा खर्च देण्याची तयारीही दशविली. परस्पर सौहार्दाचे यापेक्षा चांगले उदाहरण दुसरे काय असू शकते? सद्सद्विवेकबुद्धी आणि बंधुभावाने वाद मिटतातच शिवाय जगण्याचा मार्गही निर्माण होतो, याचीही यातून प्रचिती यावी. हे आपल्या देशातील धार्मिक सौहार्दाचे एकमेव उदाहरण नाही. ईद-दिवाळी सोबत साजरी करण्याची आपली दीर्घ परंपरा राहिली आहे. आजही अनेक गावांमध्ये हिंदू माता आपल्या मुलांना दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी त्यांना ताजियांच्या खालून नेतात. आजही रामलीलेचा मंच मुस.ीम कारागिरांकडून सजविला जातो. काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रांत एक बातमी प्रकाशित झाली होती. अयोध्येत हुनमानगढी मंदिराच्या मालकीच्या जमिनीवर एक मशीद उभारण्यासंदर्भातील ते वृत्त होते. ते मशिदीला विरोध करणारे खचितच नव्हते. हनुमानगढी मंदिराचे महंत ज्ञानदासजी यांनी केवळ या मशिदीच्या पुननिर्मितीची परवानगीच दिली नाहीतर जोवर ही मशीद तयार होत नाही तोवर या भूमीवर नमाज पठनाचाही सल्ला दिला होता. शेवटी हेसुद्धा स्वतःचेच घर आहे, असे त्यांचे म्हणणे होते. या आलमगिरी मशिदीची निर्मिती सतराव्या शतकात औरंगजेबाच्या एका शिलेदाराने केली होती. इ.स. १७६५च्या जवळपास नवाज शुजाउदुल्ला यांनी मशिदीची ही संपूर्ण जमीन हनुमानगढी मंदिराला या अटीसह दानात दिली की मशिदीत नमाज पठन सुरूच राहील. वृत्तपत्रात प्रसिद्ध बातमीनुसार कालांतराने तेथील नमाज पठन बंद झाले. मशिदीची इमारत मात्र कायम राहिली. परंतु देखभालीअभावी मशिदीची ही इमारत पडीक झाली आणि अयोध्या नगरपालिकेने येथील प्रवेशावर निर्बध घातले. काही दिवसांपूर्वी स्थानिक मुस.ीम बांधवांनी हनुमानगढीचे मुख्य महंत ज्ञानदासजी यांच्याकडे मशिदीच्या पुनर्बाधणीची परवानगी मागितली. महंतजींनी केवळ परवानगीच दिली नाहीतर यासाठी लागणारा खर्च देण्याची तयारीही दशविली. परस्पर सौहार्दाचे यापेक्षा चांगले उदाहरण दुसरे काय असू शकते? सद्सद्विवेकबुद्धी आणि बंधुभावाने वाद मिटतातच शिवाय जगण्याचा मार्गही निर्माण होतो, याचीही यातून प्रचिती यावी. हे आपल्या देशातील धार्मिक सौहार्दाचे एकमेव उदाहरण नाही. ईद-दिवाळी सोबत साजरी करण्याची आपली दीर्घ परंपरा राहिली आहे. आजही अनेक गावांमध्ये हिंदू माता आपल्या मुलांना दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी त्यांना ताजियांच्या खालून नेतात. आजही रामलीलेचा मंच मुस.ीम कारागिरांकडून सजविला जातो.